Lonche म्हटलं कि ते अबाल वृद्धां सहित सगळ्यांच्याच आवडीचं असतच. त्यात प्रत्येक घरची लोणचं बनवण्याची स्वतःची
एक वेगळी पारंपरिक पद्धत पण असते जशी विभागानुसार भाषा बदलते तशाच Lonche बनवण्याच्या पद्धती पण बदलतात
तर या ब्लॉगमध्ये आपण विविध प्रकारच्या लोणच्यांच्या पद्धती पाहणार आहोत
ओल्या लाल मिरच्यांचे Lonche
साहित्य :-
लाल मिरच्या ५०० ग्रॅ. १ वाटी मोहरीची डाळ, २.टी. स्पू, जिरेपुड, गरम मसाला २ टे. स्पू कलौंजी पुड २ टी. स्पू. मेथी दाणे पुड १ टी. स्पू. हिंग पाव १ टी. स्पू. मीठ, आमचूर १/२ वाटी, मोहरीचे तेल गरजेनुसार.
कृती-
मिरच्या धुऊन पुसून कोरडी करून देठ काढून बिया काढून घ्या. मोहरी डाळ मिक्सरमधून बारीक करा. एका परातीत सर्व साहित्य वेगवेगळे ठेवा.
मोहरीचे तेल गरम करून प्रत्येक जिन्नसवर थोडं थोडं ओतून भाजून घ्यावे. एकत्र करावे, हा मसाला मिरच्यांमध्ये भरावा.
मसाला थोडा दाबून भरावा, मिरच्या बाटलीत ठेवा. त्यावर गरम केलेले तेल थंड झाल्यावर मिरच्या बुडेपर्यंत ओता. नंतर ५-६ दिवस उन्हात ठेवा.
मेथीदाणा लसूण Lonche
साहित्य :-
मेथीदाणे २०० ग्रॅ. लसूण पाकळ्या २५-३०, किसलेली कैरी २०० ग्रॅ. २ टे. स्पू. साखर, १ टे. स्पू. हळद, १ टी. स्पू. हिंग, लालतिखट मीठ चवीनुसार तेल गरजेप्रमाणे.
कृती: –
किसलेली कैरी, मीठ, मेथीदाणे मिक्स करावे, २ दिवस. बाजूला ठेवा, कैरीच्या पाण्याने मेथीदाणे नरम होतील.
सर्व मसाले एकत्र करून वरून गरम तेल ओतून भाजून घ्या. मसाला थंड झाल्यानंतर लसूण आणि कैरी मेथी मिक्स करा. बरणीत भरून वरून थंड तेल ओतावे.
नवरत्न Lonche
साहित्य:-
खजूर पावशेर, ५० ग्रॅ. किसमिस, ५० ग्रॅ. काजू, ५० ग्रॅ. बदाम, कैरीचा किस २५० ग्रॅ. ५०० ग्रॅ. साखर, सुंठ पावडर २ टी. स्पू. दळलेले काळी मिरी १ टे. स्पू. काळे मीठ १ टे. स्पू. साधेमीठ गरजेनुसार, हिंग १ टी. स्पू.
कृती:-
खजुराचे-बदामाचे-काजूचे पातळ काप करावे. सर्व साहित्य एकत्र करून बाटलीत भरून उन्हात ठेवावे. १०-१२ दिवस थंड जागेवर ठेवा.
बाळकैऱ्यांचे भरले Lonche –
साहित्य-
लहान कैऱ्या १ किलो, मोहरी पुड १ वाटी, २२५ ग्रॅ. मीठ किंवा चवीनुसार, कलौंजी २ टे. स्पू., बडी शेव दोन टे. स्पू. २ टी. स्पू गरम मसाला, १/२ टी. स्पू. हिंग, हळद, लालतिखट, तिळाचे तेल.
कृती-
कैऱ्या धुऊन कोरडी करा. भरलेले वांग्याप्रमाणे चिरून घ्या. आतील कोय काढून घ्या. बडीशेप-कलौंजीची भरडपूड करा.
तेल गरम करायला ठेवा, सर्व मसाले आणि मीठ एकत्र करून त्यावर थोड गरम तेल टाका. मसाला कालवून कैऱ्यात भरा,
बरणीत कैऱ्या ठेवा उरलेला मसाला वरून टाका व मिक्स करा नंतर तेल टाका. ! दिवस उन्हात ठेवा. मधून-मधून ढवळा. ८-१० दिवसात खाण्यासाठी तयार होईल.
गोड कैरी Lonche –
साहित्य-
कैरी १ किलो(आंबट असेल ते उत्तम), मोहरी डाळ १०० ग्रॅ. धणे ५० ग्रॅ. मेथी दाणे २५ ग्रॅ. गूळ ५०० ग्रॅ, मीठ, लालतिखट चवीनुसार, २ टे. स्पू. लवंग दालचिनी जायफळ पुड, हिंग, तिळाचे तेल.
कृती-
कैरीच्या मध्यम फोडी करून घ्या. धणे-मेथीदाण्याची भरडपूड करा. गूळ किसून घ्या, मोहरीडाळ, धणेपुड, मेथी कोरडी भाजून घ्या.
हिंग पूड करा, एका परातीत लाल-तिखट, हिंग व सर्व मसाले एकत्र करून त्यावर थोडं गरम तेल ओता, किसलेले गूळ व मीठ टाकून एकत्र करा.
कैऱ्यांच्या फोडी घालून नीट कालवा. त्याला वरूण तेलाची झणझणीत फोडणी करून लोणच्यावर ओतवून बरणीत भरून घ्या . अधूनमधून हलवत रहा.
फणस कैरी Lonche –
साहित्य-
कोवळे फणसाचे मध्यम आकाराचे तुकडे ५०० ग्रॅ. आंबट कैरी किसलेली २५० ग्रॅ. हळद २ टे. स्पू. मोहरी डाळ १०० ग्रॅ. हिंग २ टी. स्पू. सुक्या लाल मिरच्यांची भरडपूड, मीठ, बडीशेप १ टे. स्पू. मेथीदाणे २ टी. स्पू. मोहरीचे तेल.
कृती-
बडीशेप – मेथीदाणे भरडून घ्यावे, तेलाची फोडणी करून त्यात मेथी दाणे-हळद हिंग घालावी, सर्व मसाले एकत्र करून त्यावर
ही फोडणी मध्यम गरम ओतावी. गार झाल्यावर फणसाचे तुकडे आणि कैरीचे किस मिक्स करून बरणीत भरावे. वरून तेल टाकावे अधूनमधून हलवत रहावे.
हिरव्या मिरच्यांचे Lonche –
साहित्य-
हिरवी मिरची २०० ग्रॅ. मोहरी डाळ ५० ग्रॅ. मेथीदाणे १ टी. स्पू. हळद १ टे. स्पू. हिंग १ टी. स्पू., ६ लिंबू तेल.
कृती –
मिरच्यांचे बारीक काप करावे. मेथीदाणे आणि हिंग भाजून कुटून घ्या. मोहरीडाळ मिक्सरवरून बारीक करून घ्यावी.
हळद मोहरी डाळ, मेथीदाणे कोमल तेलात परतून घ्या, मिरच्या-मोहरी- मेथी-पुड-हिंग-मीठ एकत्र करावे. त्यावर लिंबू रस घालावा.
किंवा लिंबाचे बारीक काप करून मिक्स करा. हे लोणची उन्हात २ दिवस ठेवा नंतर सावलीतच मुरू द्या.
निष्कर्ष:-
पद्धत कोणतीही असू देत लोणचं हा सगळ्यांच्या आवडीचा आणि तेवढाच जिव्हाळ्याचाही विषय आहे मी अपेक्षा करते की ह्या लोणच्याच्या पद्धती तुम्हाला आवडल्या असतील
Disclamer
जशा Lonche बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तसेच बऱ्याच पद्धतींमध्ये साम्यही असू शकते लोणचे बनवण्याच्या
ह्या पद्धती मी माझ्या आजोळी शिकले आहे त्यात बरेचसे साम्य असणेही शक्य आहे पण मला माहिती असणाऱ्या पद्धती
शेअर करणे ह्याव्यतिरिक्त या पोस्टचा दुसरा कोणताही हेतू व उद्देश नाही आपण बनवत असलेल्या कृतींशी जर या कृतींचे साम्य दिसत असेल तर तो निखळ योगायोग समजावान