वटसावित्री पौर्णिमा व्रत 2023 – अशी करा वडसावित्रीची पूजा  

वटसावित्री पौर्णिमा व्रत करण्याची पद्धत, विधी,कथा व आरती

वटपौर्णिमा, ज्याला वटसावित्री पौर्णिमा व्रत  किंवा वट पौर्णिमा व्रत असेही म्हणतात, हा एक हिंदू सण आहे जो भारतातील विवाहित महिला मनोभावे साजरा करतात .

मराठी महिन्यान नुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केले जाते  येतो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मे किंवा जून महिन्यात येतो.

या वर्षी वटसावित्री पौर्णिमा व्रत शनिवार ३ जून २०२३ रोजी असणार आहे. 

हा दिवस प्रेम, भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या सावित्रीच्या सन्मान करण्यासाठी समर्पित आहे. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण पूजा विधी,कथा व आरती सहित  सणाचे महत्त्व,जाणून घेणार आहोत .

महाराष्टा समेत बऱ्याच ठिकाणी  वडसावित्री पौर्णिमा व्रत तीन दिवस केले जाते म्हणजे जेष्ठ पौर्णिमेच्या दोन दिवस आधीपासून उपवास पकडले जातात याचे कारण आपल्याला व्रताच्या कथेत समजेल.

वटसावित्री पौर्णिमा व्रत पूजा  :-

या व्रताची पूजा करण्यासाठी विवाहित महिला वडाचे झाड असणाऱ्या ठिकाणी जातात पण आजच्या काळात मुख्यतः शहरी भागात वडाचे झाड जवळपास असणे किंवा तिथे जाऊन पूजा करणे बऱ्याच जणींना शक्य होत नाही अशावेळी काय करू शकतो ?

१) बोन्साय केलेलं वडाच झाड विकत आणू शकता 

या संदर्भात बरीच वेगवेगळी मत ऐकायला मिळतील कि बोन्साय केलेल्या झाडाची पूजा करावी कि नाही .पण शेवटी आहे तर ते वडाचेच झाड . 

२) व्रताचा लागत आणू शकता 

 आज -काल वटसावित्री पौर्णिमा व्रत पुजेचे सचित्र कागद भेटतात बऱ्याच जणी त्याचीही पूजा करतात 

३) रांगोळी ने वट वृक्ष काढून पूजा करू शकता 

पूजा सामग्री :

फुले, उदबत्ती, फळे, प्रसाद (मिठाई,साखर) पाणी, धागा (मोळी किंवा कालव), कोरे वस्त्र,ओटीचे सामान, हळद, कुंकू, गुलाल अक्षदा(तांदूळ) धूप आणि दिवा (आरतीसाठी) समोर ठेवा विड्याची पान, सुपारी .

जर फोटो ची किंवा रांगोळीची पूजा करत असाल तर कलश मांडावा 

वटसावित्री पौर्णिमा व्रत पूजा विधि

 ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ते ठिकाण झाडून पुसून स्वच्छ करावे पूजा विधीच्या नियमानुसार सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलित करावा व विड्याच्या पानावर सुपारी ठेवून गणपती प्रतीकाची स्थापना करावी

 दीप पूजन

 दीप प्रज्वलित केल्या नंतर दिव्याला हळदीकुंकू अक्षद फुल व साखरेचा नैवेद्य दाखवून नमस्कार कराव करावा

 गणपती पूजन

कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणपती पूजन शिवाय अपूर्ण मानली जाते आद्यपूजन्य देवता आद्यपूजन्य देवता आद्यपूजन्य

पूजनीय देवता गणपती यांचे नामस्मरण करत हळद-कुंकू अक्षर लाल फुल किंवा दुर्वा वाहून साखरेचा नैवेद्य कर दाखवून नमस्कार करावा

वट पूजन

वटवृक्षाची पूजा करताना सर्वप्रथम वटदेवतेला पाणी समर्पित करावे नंतर दूध  किंवा पंचामृत फुलांनी किंवा बेल पाण्याने शिंपडावे व पुन्हा पाणी समर्पित करावे

आता वटवृक्षाला  हळद-कुंकू लावावे अक्षदा  वाहाव्या फुल समर्पित करावे गुलाल लावावा साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करावी

आपण आणलेला धागा वटवृक्षाला हळदीने किंवा कुंकवाने चिटकवावा आणि वटवृक्षाच्या सात फेऱ्या माराव्या या सात फेऱ्या सात जन्माचे प्रतीक मानले जाते हळदीकुंकू हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा की सात जन्म हाच पती मिळावा व सौभाग्य टिकून राहावे

सात फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता वटदेवतेच्या पुढे ओटी भरावी त्यासाठी आपल्या जवळील कोरा खानाचा कपडा किंवा

खानाचा कपडा खण किंवा ब्लाउज पीस मांडलेल्या गणपती जवळ ठेवावे त्यावर थोडी अक्षर ठेवून सती सावित्री चे स्मरण

करावे व हळद-कुंकू ठेवून तिचा सन्मान करावा आता सुकवलेले फळ किंवा खारीक आणि गहू किंवा तांदूळ यांनी  ओटी भरावी

वट पूजेचा विधी पूर्ण झाल्यानंतर आरती करावी. बऱ्याच ठिकाणी वटवृक्षा जवळ बसून सुहासिनी स्त्रिया सुवासिनी स्त्रिया सत्यवान व सावित्री यांचे कथा सांगतात व श्रवण करतात

वडसावित्री पौर्णिमा व्रत  कथा व आरती झाल्यानंतर पाच सौभाग्यवती स्त्रियांना फळ देऊन ओटी भरावी

प्रत्येक कुटुंबाची किंवा समाजाची व्रतवैकल्य करण्याची स्वतःची वेगळी पद्धत असू शकते

जर आपण घरी पूजा केली असेल  तर मांडलेल्या कलशाला धागा बांधून सात फेऱ्या माराव्या संध्याकाळी वडसावित्री पौर्णिमा

व्रताची कथा करावी व आपल्या पद्धतीने नुसार उपवास सोडावा किंवा उपवासाचा फराळ ग्रहण करावा

वटपौर्णिमेचा उपवास हा निरंकार मानला जातो म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडला जातो 

वडसावित्री पौर्णिमा व्रताचे महत्त्व, 

हिंदू संस्कृतीतील विवाहित स्त्रियांसाठी  हा सण खूप महत्वाचा आहे. हा शुभ दिवस पतींबद्दल प्रेम, आणि निष्ठा व्यक्त

करण्यासाठी समर्पित आहे. वट पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित करणारे काही प्रमुख पैलू 

वैवाहिक आनंदाचे प्रतीक:

वट पौर्णिमा पती-पत्नीमधील पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. हे विवाह संस्थेमध्ये सामायिक केलेल्या वचनबद्धतेचे आणि प्रेमाचे

स्मरण म्हणून काम करते. स्त्रिया आपल्या पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्यासाठी हे व्रत पाळतात.

सावित्रीच्या भक्तीबद्दल आदर: 

सावित्री आणि सत्यवान यांच्या आख्यायिके नुसार पतीचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीची अटल भक्ती आणि दृढनिश्चय दर्शवते.

तिचे समर्पण, धैर्य आणि निस्वार्थीपणा विवाहित महिलांसाठी प्रेरणा बनले आहे, वट पौर्णिमा हा दिवस तिच्या सद्गुणांचा सन्मान करण्यासाठी बनवला आहे.

आध्यात्मिक महत्त्व:

वट पौर्णिमेला आध्यात्मिक महत्त्व आहे कारण त्यात उपवास, प्रार्थना आणि ध्यान यांचा समावेश होतो. हे स्त्रियांना पत्नी म्हणून

त्यांची भूमिका आणि सावित्रीच्या गुणांवर चिंतन करण्यास अनुमती देते. हे आत्म-शिस्त, भक्ती आणि आत्मनिरीक्षण करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे वैयक्तिक वाढ आणि आध्यात्मिक विकास होतो.

सांस्कृतिक परंपरा:

वट पौर्णिमा ही भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे आणि ती उत्साहाने आणि भक्तीने साजरी केली जाते. हे समाजातील

महिलांना एकत्र आणते, सौहार्द आणि एकतेची भावना मजबूत करते. आशीर्वादांची देवाणघेवाण करणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि विवाहित महिलांच्या सामूहिक भावना मजबूत करण्याचा हा एक प्रसंग आहे.

वटसावित्री पौर्णिमा व्रत कथा 

ऐक देवी सावित्री तुझी कहाणी. ही कहाणी स्त्रियांच्या सौभाग्याची, पतीच्या दीर्घायुष्याची, कहाणी चातुर्याची, मृत्यूला परतवून लावायची. जसे तू यमाचे मन वळविलेस तसे सामर्थ्य आम्हाला दे !

एकदा सनतकुमार कैलासावर गेले होते. त्यांनी शंकराला प्रश्न विचारला, “महादेवा, सदाशिवा, मानवांचे कल्याण करणाऱ्या वा!

असे एखादे व्रत आहे की, की जे केले तर स्त्रियांचे सौभाग्य अखंड राहाने ? आपण लोकांच्या कल्याणासाठी ते व्रत सांगा. शंकर म्हणाले,

“पूर्वीची कथा आहे. सावित्रीने एक व्रत केले होते तिचे चरित्र प्रथम सांगतो. त्यातच तुम्हाला व्रताची माहिती मिळेल.”

मद्र नावाचा देश आहे. तेथे फार वर्षापूर्वी अश्वपती नांवाचा राजा राज्य करीत होता. तो धार्मिक होता. ज्ञानी व पुण्यवान होता.

तो पुष्कळ दानधर्म करी. त्याला सर्व सुखे होती पण संतान नव्हते. त्याने वरदसावित्री देवीची उत्तम उपासना केली. देवीच्या

कृपेने त्याला कन्यारत्न झाले. तिचे नांव सावित्री ठेवले. कन्या झाली म्हणून तो काही निराश झाला नाही.

कन्येला त्याने अनेक विद्या शिकविल्या. ती बुद्धिमान, सुंदर, सदगुणी व तेजस्विनी होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा राजाने

तिचे स्वयंबर करायचे ठरविले. सावित्री म्हणाली, “मी स्वतः देशोदेशी जाऊन माझ्या योग्यतेचा वर मी शोधून काढीन. मला

अनुना द्यावी.” राजाने ते मान्य केले. बरोबर सैनिक दिले. ती देशोदेशी हिंडली.

युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवान हा वर तिने पसंत केला. युमत्सेन राजा अंध होता. त्याचे राज्य दुसऱ्याने बळकावले होते. राणी व

सत्यवानासह निर्वासित झालेला तो राजा अरण्यात राहात होता. सावित्रीचा निश्चय नारदाना कळला. “सत्यवान गुणी आहे पण अल्पायुषी आहे.

पुढील ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी त्याचा मृत्यु आहे !” असे नारदांनी राजाला सांगितले. “मुली, तू दुसरा वर निवडावा-” राजा तिला

म्हणाला, पण सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही. तिने सत्यवानाशीच विवाह केला.

सत्यवानाला एक वर्षाने मरण येणार आहे हे तिने कोणालाही सांगितले नाही. सत्यवानासही सांगितले नाही. तिने अरण्यात

राहून सासूसासरे व पतीची मनोभावे सेवा केली. ज्येष्ठ पौर्णिमेच्या आधी तिने तीन दिवस उपोषण केले.

सत्यवान लाकडे आणण्यासाठी अरण्यात जात असे तेव्हा तीही नेहमी बरोबर जाई. पौर्णिमेच्या दिवशी तो निघाला तशी तीही निघाली. सत्यवान म्हणाला- “सावित्री, तू तीन दिवस उपास केला आहेस. तू आज रानात येऊ नकोस.” पण ती हट्टाने गेलीच.

त्या दिवशी लाकडे तोडून झाली. सत्यवान दमला मोळी बांधून ठेवली. खाली ठेवली. एका वडाच्या झाडाखाली तो आडवा

झाला व त्याला ग्लानी आली. तो बेशुद्ध झाला. सावित्रीने ही भयंकर वेळ आली असे ओळखले. तिने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले.

ती त्याला पदराने वारा घालू लागली. तेवढ्यात तिच्या दिव्य दृष्टीला दिसले. महिषारूढ यमराज आला आहे. पाश टाकून पतीचा

सूक्ष्म देह तो नेऊ लागला आहे. ती तशीच उठली. यमामागून जाऊ लागली. यम म्हणाला, “मुली मागे फिर.” सावित्री म्हणाली-“जेथे माझे पती तेथेच मी जाणार.

मी पतिव्रता त्यांना सोडून रहाणार नाही. मला पण घेऊन चला. आपण धर्मराज ! धर्म जाणता. मला माझा धर्म पाळू दे.” तिचे

पवित्र मन त्याला कळले. तो म्हणाला, “तुजवर मी प्रसन्न आहे. एक वर माग. पतीचे प्राण मागू नको.” तिने वर मागितला,

“माझ्या अंध सासऱ्याला दृष्टी येऊ दे.” यम म्हणाला, तथास्तु ! आता मागे फिर ! पण ती परत जाईना.

यमाच्या मागोमाग ती चालत राहिली. फार दूरवर गेली. अनेक सुमधूर वचने बोलून तिने यमाकडून दुसरा वर मिळविला.

सज्जनांसह सात पावले चालल्यावर त्यांची मैत्री होते. सज्जन कधी असत्य बोलत नाहीत. सत्संगतीने सर्व काही मिळते !

मला असा वर द्यावा की माझ्या सासऱ्यांना त्यांचे राज्य परत मिळो. “तथास्तु !” यम म्हणाला व रेड्यावर बसून पाशामध्ये

सत्यवानाचा सूक्ष्म देह घेऊन पुढे चालू लागला. सावित्री सुद्धा मागोमाग जाऊ लागली. तिने यमाची उत्कृष्ट शब्दात स्तुती केली.

यमाने तिसरा वर देऊ केला. ती म्हणाली, “आपण प्रसन्न झाला असाल तर माझ्या निपुत्रिक पित्याला पुत्र हावा. यमाला

सावित्रीच्या परोपकारी वृत्तीचे कौतुक वाटले. तिने स्वत:साठी अजून काही मागितलेच नव्हते. त्याने तोही वर देऊन टाकला.

पण सावित्री काही परत जाईना. तिने अनेक धर्मतत्त्वे सांगून यमाच्या मनात स्वतःबद्दल आदर निर्माण केला. विचार न करता

“मी प्रसन्न आहे. वर माग.” ती म्हणाली,” “सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व वंशवृद्धी व्हावी.” “तथास्तु असे यम म्हणाला तेव्हा

सावित्रीने पटकन यमाच्या पाया पडून

म्हटले- “अहाहा ! सत्यवचनी यमधर्मा ! आपले वरदान स्वरे होण्यासाठी माझे पती जिवंत होऊन त्यांनी मजबरोबर संसार करायला हवा !”

तो म्हणाला यम स्वतःच्याच वचनात गुंतला होता. सत्यवानाचे प्राण परत देणे त्याला भाग पडले. तो आणखीनच प्रसन्न झाला.

त्याने सत्यवानाचे पाश काढून घेतले व म्हणाला – “जा, सत्यवान व झोपेतून उठल्याप्रमाणे उठेल. तुझे सौभाग्य अक्षय राहो.”

सावित्री यमाला वंदन करून परत आली तो सत्यवान

वटवृक्षाच्या बुंध्याशी पडलेला होता तो उठला. सावित्रीला परमानंद झाला. त्याला घेऊन ती हळूहळू घरास आली. तिच्या

भ्वशुराला दृष्टी आली होती. दतांनी येऊन त्याला त्याचे राज्य प्रधानाने त्याच्यासाठी परत मिळवले आहे असा संदेश दिला होता.

सुनेच्या चातुर्याने व पतिनिष्ठेने सारे वैभव परत मिळाले.

ही कहाणी वाचावी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत वटसावित्री व्रत करावे. पौर्णिमेस सकाळी वडाची पूजा करावी कारण यमाने सावित्रीला सांगताना म्हटले होते – मुली, जी  सुवासिनी ही तुझी कहाणी वाचील व ज्येष्ठ पौर्णिमेस वडाची

पूजा करून त्रिदिवसीय व्रत पूर्ण करील तिचेही सौभाग्य अक्षय राहील असा माझा आशीर्वाद आहे. जसे यश सावित्रीला मिळाले तसे यश व अक्षय सौभाग्य व्रत, करणाऱ्या सुवासिनींना मिळो.ही साठा उत्तरांची कहाणी पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

आरती

सुरुवातीला गणपतीची आरती म्हणावी  नंतर वटसावित्री पौर्णिमा व्रताची आरती म्हणावी

गणपतीची आरती

वटसावित्री पौर्णिमा व्रत

वटसावित्री पौर्णिमा व्रताची आरती

गणपतीची आरती

Faq

वटसावित्री पौर्णिमा व्रत कुमारिका मुली करू शकतात का?

 इच्छित वर प्राप्त व्हावा म्हणून पंधरा वर्षानंतरच्या कुमारिका मुलीही वटसावित्री पौर्णिमा व्रताचे पालन करतात

 वटसावित्री पौर्णिमा व्रत कोणी करावे

 सर्व विवाहित महिलांनी व सौभाग्यवती महिलांनी वटसावित्री पौर्णिमा व्रत मनोभावे आचरावे ज्या किशोरवयीन मुलींना इच्छित्पती प्राप्त करण्याची इच्छा आहे त्यांनीही हे व्रत आचरण करायला हरकत नाही 

वटसावित्री पौर्णिमा व्रत कोणी करू नये?

 ज्या महिला गर्भवती आहेत मुख्यतः ज्यांचा गर्भारपणाचा सातवा महिना चालू आहे अशा  महिला, तसेच वयोवृद्ध किंवा व्याधींनी ग्रासलेल्या( आजारी असणाऱ्या) महिलांनी व्रत करणे टाळावे
 आयुर्वेदातील प्रमाणानुसार कोणतेही  व्रत वरील  परिस्थिती मधील स्त्रियांनी करू नयेत

 व्रतासाठी कोणती साडी घालावी?

 जास्त तर महिला जरी काठाच्या साड्या किंवा भरगच्च अशा साड्या घालण्यास प्राधान्य देतात पण व्रताच्या पूजेसाठी नेहमी कोरी व सुती साडी घालावी . 

निष्कर्ष 

एकंदरीत वटसावित्री पौर्णिमा व्रत व्रताला विवाहाचे पवित्र बंधन साजरे करणारा आणि वैवाहिक नातेसंबंधातील प्रेम, भक्ती

आणि निस्वार्थीपणा या मूल्यांवर भर देणारा सण म्हणून खूप महत्त्व आहे. हे विवाहित जोडप्यांना त्यांच्या भागीदारीची

जोपासना आणि पालनपोषण करण्यासाठी, सुसंवादी आणि परिपूर्ण वैवाहिक जीवनासाठी दैवी आशीर्वाद मिळविण्यासाठी एक स्मरणपत्र म्हणून काम करते.

Leave a comment