रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व वाचक वर्गाला भाऊ- बहिणीच्या विशेष सणा बद्दल खुप खुप शुभेच्छा
रक्षाबंधन म्हटले की गाठीभेटींसोबत आठवणी ही ताज्या होणार कोणी कुठे दूरवर शिकायला असेल किंवा कुण्या एका भावाची बहीण लग्न होऊन सासरी गेलेली असेल अशांना राखी पौर्णिमेला लिफाफा मध्ये येणाऱ्या राखीची ही चाहूल लागलीच असेल
या रक्षाबंधनाला द्या आपल्या बहिणीला आणि भावाला भरभरून गोड गोड अशा शुभेच्छा
आजच्या दिवसासाठी खास अशा Wishes, Images, Quotes, Photos, Greeting, Message, जे तुम्ही तुमच्या
Whatsapp and Facebook Status साठी वापरू शकता आणि आपल्या जिवलगांना शुभेच्छा देऊ शकता
नाती सगळीच खास असतात
त्यात काही वेगळी आणि अनमोल असतात
आपलेही कडे असं एक गोड सोज्वळ नातं आहे
याची जाणीव हाती बांधलेल्या राखीने होत राहते
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जसं सुरांचा सौंदर्य त्यांचा राग आहे
तसंच तुझी माझी भांडण आपल्यातल्या एकोप्याचा
अन प्रेमाचा भाग आहे
रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत
स्वतःची कामे स्वतः करायला शिक सतत तुझी कामे करायला मी रिकामा नाही
असं म्हणून मला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्या भावाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
मुलगी आहे म्हणून सोडतो नाही तर तुला सांगितलं असतं की डावा हात कसा लागतो पासून तर सासरी कोणी त्रास दिला तर सरळ मला सांगायचं पर्यंतचा आधार देणारा माझ्या भावाला राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
कष्ट घेऊन शिकू शकतेस तर तू त्या शिक्षणाचा वापर करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकते काही मदत लागली तर मी करेन ना
असं म्हणून आत्मविश्वास देणाऱ्या माझ्या भावाला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा
तुला वाटतं तू चिडवल्यावर मी चिडते पण तू का चिडवतो हे मला कळत नाही पण खरं तर ते मला कळते पण वळत नाही
म्हणून मी चिडते अशा या अनलॉजिकल गोष्टींवर चर्चा करणाऱ्या आणि प्रत्येक भांडणानंतर समोरच्याला काय वाटले याचा सतत अंदाज घेत असणाऱ्या सर्व भाऊ आणि बहिणींना या गोड सणाच्या भरभरून शुभेच्छा
सारांश
रक्षाबंधन शुभेच्छा मराठीत देणाऱ्या ह्या चारोळी आपण आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया चॅनल वर
शेअर करू शकता आणि आपल्या बहिणीला किंवा भावाला राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकतात