पंडित प्रदीप मिश्राजी चा शिवमहापुराणातील धनप्राप्तीचा उपाय 2023

शिवमहापुराणातील धनप्राप्तीचा उपाय

शिवमहापुराणातील धनप्राप्तीचा उपाय

शिव महापुराणांमध्ये जीवनाशी निगडित समस्या व त्यांचे उपाय सविस्तर स्वरूपात दिले आहेत आता नुकताच अधिक महिना

सुरू झाला आहे. शिवमहापुराणांमध्ये धनप्राप्तीचा उपाय सांगितला आहे जो अधिक महिन्यात केला जातो ज्याची माहिती

आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.

 शिव महापुराण हा हिंदू धर्मातील अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हिंदू धर्मातील सर्वच ग्रंथांमध्ये मानवाचे जीवन कल्याणमय

व सुख-समृद्धीने युक्त बनविण्यासाठी समस्यांचे निवारण करणारे सहज सोपे व साठी उपाय सांगितले आहेत.

 आजकालच्या वाढत्या धकाधकीच्या जीवनात व महागाईच्या काळात धनप्राप्ती हे प्रत्येकाचे उद्दिष्ट बनले आहे अनेक असे

भाविक असतात ज्यांना असंख्य प्रयत्नानंतरही यश प्राप्त होत नाही कुठे नेमकं काय चुकतंय हे कळत नाही अशावेळी

प्रत्येकच जण परमेश्वराला शरण जातो व धार्मिक ग्रंथांचा ज्योतिषशाचा आधार घेऊन काही उपाय करू पाहतो जेणेकरून आपल्या प्रयत्नांना यश मिळेल.

 कोणताही उपाय प्रयत्न शिवाय अपुरा आहे प्रयत्न करत असताना जर दैव गती किंवा आशीर्वाद कमी पडत असेल तर अशावेळी भगवंताला शरण जाऊन काही उपाय केले जाऊ शकतात.

महाग्रंथ शिवमहापुराणातील धनप्राप्तीचा उपाय

 हा उपाय मुख्यतः अधिक महिन्यात करण्याचे महत्त्व आहे पूजने श्री प्रदीप मिश्रा गुरुजींनी शिवमहापुराणातील  या उपायाची फोड करून सांगितलेली आहे त्यांच्यानुसार

 अधिक महिन्यातील पंचमी तिथी ही शुभ तिथी असते अधिक महिन्यातील पंचमी तिथीला उसाचा रस उजव्या हातात घेऊन

नाव व गोत्र बोलून तुळशी वृंदावनात सात वेळा टाकल्याने धनप्राप्तीच्या मार्गातील बाधा दूर होण्यास मदत होते व धनप्राप्तीसाठी करू पाहणाऱ्या  प्रयत्नांना यश मिळते

 यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 18 जुलै रोजी अधिक मासाचा प्रारंभ झालेला आहे त्यानुसार 23 जुलै म्हणजे रविवारी पंचमी तिथीचा योग उत्पन्न होतोय अर्थात धनप्राप्तीचा हा उपाय आपल्याला 23 जुलै रोजी करणे गरजेचे आहे

 त्यासाठी स्नानाधिक्रिया पूर्ण करून घरातील कुळ देवतांचे पूजन करून नंतर तुळशी मातेचे पूजन करावे व ताजा उसाचा रस

आणावा तुळशी मातेचे पूजन झाल्यानंतर मातेला आपल्या मनातील सद इच्छा बोलून दाखवावी व कार्यपूर्ती धनप्राप्ती आणि

यशस्वी होण्याचे आशीर्वाद मागावे त्यानंतर उजव्या हातात ओंजळीत बसेल असे इक्षु रस( उसाचा रस)  घेऊन आपले नाव व गोत्र बोलून सात वेळा वृंदावनात समर्पित करावे. 

अनन्याशा भावभक्तीने प्रार्थना करावी नमस्कार करावा

 शिव महापुराणातील धनप्राप्तीच्या या उपायाची फोड गुरुजींनी करून मनोबल वाढवण्याचे व प्रयत्नशील असण्याचे आशीर्वाद दिले आहेत हा उपाय नक्की करून पहा व आपल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा

 निष्कर्ष

शिवमहापुराणातील धनप्राप्तीचा उपाय जो श्री पूज्यनीय प्रदीप मिष्रा जी महाराजांनी उलघडून सांगितलेला आहे त्याची माहिती

या पोस्टमध्ये दिली आहे.  हिंदू महाग्रंथातील अशाच उपायांचा लाभ घेण्यासाठी व माहिती घेण्यासाठी या वेबसाईटवरील पोस्ट

ला नक्की व्हिजिट  करा माहिती आवडली असल्यास व उपयुक्त वाटली असल्यास शेअर करायला विसरू नका

धन्यवाद !

Disclaimer 

ही पोस्ट केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिली आहे या पोस्टमार्फत कोणत्याही  अंधविश्वासाला किंवा  अधार्मिक गोष्टींना  पाठिंबा देणे हा उद्देश नाही तसेच कोणत्याही  धर्माचा अपमान करणे हाही उद्देश नाही याची नोंद घ्यावी 

Leave a comment