कोणत्याही गुंतवणुकी शिवाय फक्त गुणवत्तेच्या आणि इच्छेच्या बळावर करूशकण्या सारख्या
Online Part-time Business Ideas ची माहिती आजच्या पोस्ट द्वारे देण्याचा प्रयत्न करू या पोस्ट मदतीने तुमची
Online Part-time Business Ideas संदर्भातली मत बदलतील आणि तुमच्या व्यवसाय दृष्टिकोणाला वेगळी दिशा मिळेल .
पैसे कमावणे ही आज प्रत्येकाची गरज बनली आहे. यात विद्यार्थी देखील वेगळे नाही. भारतात कित्येक दशकं पासून नोकरी किंवा व्यवसाय सुरु करण्या आधी शिक्षण पूर्ण करण्यावर जास्त भर दिला जातो.
अर्थात ते महत्वाचे आहे पण आज बरेच विद्यार्थी असे ज्यांना कुटुंबाची जवाबदारी सांभाळून शिक्षण पूर्ण करावे लागते, किंवा
त्यांना घरच्या मंडळींवर त्यांचं खर्चाचे ओझे वाढवायची इच्छा नसते. अशावेळी एक उत्तम उपाय आहे तो म्हणजे Part-time Business किंवा Job करणे.
स्वतःच्या बुद्धीमत्ता आणि कौशल्याच्या बळावर Online Part-time Business द्वारे तुम्ही जवळपास १ ते १.५ लाख रुपया
पर्यंत कमावू शकता विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम काही वाईट नाही.
अशाच काही Online Part-time Business Ideas आपण आज Discuss करणार आहोत.
Online Part-time Business Ideas
1 Affiliate Marketing
Affiliate Marketing ही सध्याच्या वेळेत चालणारी अतिशय भन्नाट व्यवसाय कल्पना आहे. यामध्ये online पद्धतीने
कोणत्याही कंपनीचा प्रॉडक्ट जसेकी कपडे,सामान विकले जाते ज्यावर कमिशन ठरलेले असते. जस Amazon या online
मार्केट वर Affiliate Marketing चे ऑपशन्स सापडतात म्हणजे जर आपण Amazon च्या साहाय्याने काही product विकू आपल्यालाही मुळतो
आवश्यक कौशल्ये:- समस्या सोडवणे, Creativity, Communication
2 Video Editing
व्हिडिओ एडिटिंग आजच्या इंटरनेटच्या काळामध्ये चालणारा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे आजकालच्या जनरेशनचे लोक
स्वतःच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांना व्हिडिओचे स्वरूप देऊ इच्छितात ज्यात Pre wedding video shoot, birthday video shoot, baby bum video shoot सारख्या क्षणांचा समावेश केला जातो
प्रत्येकाच वेळेस पूर्ण व्हिडिओ अगदी व्यवस्थित बनेल असे नसते त्यामध्ये उपयोगात न येणाऱ्या गोष्टी एडिट करून कमी
केल्या जातात म्हणजे व्हिडिओला सुंदर बनवण्यासाठी एक्स्ट्रा मोमेंट्स काढून टाकले जातात या प्रोसेस ला व्हिडिओ एडिटिंग असे म्हटले जाते
आज-काल हे प्रोफेशन अतिशय लोकप्रिय बनत चालले आहे जर तुम्हाला व्हिडिओ शूट करण्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही या क्षेत्रासाठी प्रयत्न नक्की करू शकता
आवश्यक कौशल्य:- एकाग्रता व्हिडिओमध्ये आवश्यक आणि अनावश्यक घटकांची माहिती
3 Content Creating
कन्टेन्ट क्रिएटिंग हा शब्द तुम्ही नक्कीच टिक टॉक च्या काळामध्ये ऐकला असेल म्हणजे कोणत्याही नवीन गोष्टीचा क्रियेट करणे जी गोष्ट इतरांना महत्त्वाची वाटेल किंवा उपयोगी येऊ शकेल त्याला कॉन्टेन्ट क्रिएटिंग असं म्हटलं जातं
कॉन्टेन्ट क्रिएटिंग च्या नावाखाली बरेच लोक अशक्य किंवा अति अशा गोष्टी करतात पण जर तुम्हाला प्रोफेशनल कॉन्टॅक्ट
क्रिएटर व्हायचं असेल तर तुम्हाला नवनवीन गोष्टींचा आढावा घेणे गरजेचे आहे त्यात तुम्ही लुप्त झालेल्या जुन्या किंवा पारंपारिक गोष्टींचाही समावेश करू शकता
आवश्यक कौशल्य:- नवनवीन गोष्टी करण्याची व शिकण्याची जिद्द
4 Digital Marketing
डिजिटल मार्केटिंग याचे कित्येक कोर्स गुगल गॅरेजवर सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही कोणताही बिझनेस ऑनलाइन पद्धतीने
कसा करायचा त्याची मार्केटिंग कशी करायची याचे ज्ञान शुद्ध गुगल कडूनही घेऊ शकता
अन्या अशा प्लॅटफॉर्म वरही डिजिटल मार्केटिंगचे की ते कोर्सेस फ्री मध्ये मिळतात ज्यामुळे कोणतेही क्षेत्र व्यवसाय जेव्हा
आपण ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त कस्टमर कडे कसं पोहोचावं व मार्केटमध्ये स्वतःची पोझिशन कशी बनवावी याची माहिती दिली जाते
मोठ मोठ्या कंपन्या डिजिटल मार्केटर व्यक्तीकडून आपल्या कंपनीचे मार्केटिंग करवतात
आवश्यक कौशल्य:- क्रिएटिव्हिटी आणि काम करण्याची जिद्द
5 Content Writing
कन्टेन्ट रायटिंग हे अगदी ब्लॉग रायटिंग सारखे असते ज्यामध्ये तुम्हाला एसइओ फ्रेंडली रायटिंग करायची असते ज्यामध्ये
नवनवीन माहिती वेगवेगळ्या विषयांवरचे माहिती अतिशय सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये व्यक्त करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे असते
यामध्ये लक्ष ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे आपली व्याकरण जर आपण इंग्रजी सारख्या भाषेमध्ये लिहत असाल तर ग्रामर बरोबर असणे महत्त्वाचे असते
आपल्या मायबोली मराठी मध्ये अनेक प्रकारच्या मराठी भाषा बोलल्या जातात त्यानुसार त्याची व्याकरण बरोबर असणे गरजेचे आहे
आवश्यक कौशल्य:- वाचनाची व लिखाणाची आवड असणे महत्त्वाचे आहे
6 Online Tutor:-
ऑनलाइन ट्विटर म्हणजे जर तुमच्याकडे फोन आणि इंटरनेट उपलब्ध आहे, आणि तुम्ही पुन्हा एका विषयात किंवा सर्व
विषयांमध्ये गुणवंत आहात तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ट्युशन घेऊ शकता तर अशावेळी तुम्हाला विद्यार्थ्यांचा शोधही
ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो आणि कमी जागेमध्येही तुम्ही हा व्यवसाय करू शकता.
ऑनलाइन ट्युशन ही बाब विद्यार्थी व शिक्षक या दोन्हींसाठी सोयीस्कर मानली जाते अर्थातच विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळवायला धकधक करण्याची गरज पडत नाही
आवश्यक कौशल्य:- ज्या विषयाची शिकवण देणार आहात त्या विषयाची संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे
7 Photography:-
फोटोग्राफी ही फिल्ड कोणालाच नवीन नाही प्रत्येकाला फोटो काढण्याची किंवा काढून घेण्याची हौस असते पण तुम्हाला
माहित आहे का की ही तुमची हाऊस किंवा कला तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकते? हो अगदी नॉर्मली क्लिक केलेले फोटोग्राफही वेबसाईटवर डोनेट किंवा सेल केले जातात.
जर आपण प्रोफेशनल बनू इच्छिता तर इव्हेंट कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला चांगली रक्कमही मिळू शकते
आवश्यक कौशल्य:- फोटो काढणे कॅमेरा सांभाळणे नवनवीन पोजेस इन्व्हेंट करून फोटो काढणे
8 Providing Home-Made Food:-
घरी बनलेले पदार्थ प्रत्येकालाच आवडतात पण प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो अशावेळी तुम्ही सणासुदीसाठी बनणारा फराळ आपल्या घरी बनवून ऑनलाइन पद्धतीने विकू शकतात.
जास्त वेळ घराबाहेर राहणाऱ्या किंवा जॉब करणाऱ्या महिलांना सणासुदीचा सामा करणे जमत नाही अशावेळी घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनणाऱ्या फराळाला विकत घेणे त्या पसंत करतात.
त्याचप्रमाणे पुरणपोळी धापटे यांसारख्या मराठमोळ्या पारंपारिक रेसिपी लोक ऑर्डर करून विकत घेणे आजच्या काळात पसंत करतात जर तुमच्या हाताला चव असेल तर तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता
आवश्यक कौशल्य:- स्वयंपाकाची कला आणि खाद्य पदार्थ बनवण्याचा उल्लहास अतिशय महत्वाचा
निष्कर्ष
Online Part-time Business Ideas च्या या पोस्ट मध्ये वेगवेगळ्या प्रोफेशन बद्दल बोललो आहे त्यातील तुमचा इंटरेस्ट काय आहे यावरून तुम्ही आपला व्यवसाय निवडू शकता, आणि Part-timeकाम करून पैसे कमावू शकता.