Navratri Utsav/नवरात्री उत्सव

भारतामध्ये महाराष्ट्र सहित विविध भागांमध्ये Navratri Utsav साजरा केला जातो.  नवरात्र ची सुरुवात अश्विन शुद्ध पक्ष

पासून होत असते तिथून पुढे नऊ दिवस कुळदेवीची,( दुर्गादेवीची)  उपासना आणि आराधना केली जाते.  प्रत्येक ठिकाणी हा

उत्सव साजरा करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी प्रत्येकाच्या मनातील भाव मात्र सारखे असतात

नवरात्राच्या बाबतीत आपल्या मनात अनेक शंका कुशंका असतात अनेक प्रश्न असतात त्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण थोडक्यात समजून घ्यायचा प्रयत्न करू

Navratri Utsav

 Navratri Utsav का साजरा केला जातो?

 नवरात्रींचे हे नऊ दिवस आणि दहा रात्री दुर्गादेवीची उपासना व पूजा केली जाते कारण देवी मातेने देवतांसहित सर्वसृष्टीचे

घोरपापे अशा महिषासुर नावाच्या  दैत्यापासून रक्षण केले होते महिषासुर नावाच्या दैत्यासहित असंख्य अशा दैत्यांशी मातेने  दहा दिवस आणि नवरात्रापर्यंत युद्ध केले. 

 याच प्रसंगाचा  व देवी मातेने केलेल्या श्रमाचे तात्पर्य ठेवत नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.  हा उत्सव केवळ दांडिया

किंवा गरबा खेळणे एवढ्या मर्यादित नसून असत्यावर सत्याच्या विजयाचा अहंकाराच्या नाश्याचा  नारीशक्तीचा आणि जागृतीचा महोत्सव आहे.

नवरात्री उत्सव कसा साजरा केला जातो?

 Navratri Utsav  साजरा करण्याच्या प्रत्येक प्रदेशाच्या स्वतःच्या वेगळ्या पद्धती आहेत एवढेच काय तर महाराष्ट्रातही

वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये बहुतांश ठिकाणी  मातीचे किंवा

तांब्याचे घट मांडले जातात, देवीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते शेवटच्या दिवशी होम हवन विधी केले जातात

 पूर्वी होम हवन अधिविधीनंतर बोकडा किंवा महीश  यांचा बळी देण्याची प्रथा होती परंतु काळानुसार या प्रथेची दुरुस्ती करत

आता बऱ्याच ठिकाणी कोहोळ्याला( एक फळ)  महिषासुर  मानून कापले जाते 

प्रत्येक दिवशी गटात बसवलेल्या देवीला विविध पुष्पांची माळ अर्पण केली जाते त्याचप्रमाणे देवी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तूंचा पदार्थांचा फळांचा भोग चढवला जातो.

 महाराष्ट्रामध्ये देवीचा मीठा पिठाचा जोगवा वाढण्याची प्रथा आहे,  त्याचप्रमाणे जोगवा खेळला जातो गोंधळ घातल्या जातात आणि देवी मातेच्या विविध रूपांचे पूजन केले जाते.

नवरात्री उत्सवात देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी काय करावे?

 नवरात्री उत्सवात देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या नऊ विविध स्वरूपांचे पूजन केले जाते देवीची खना नारळ आणि ओटी भरली जाते. 

गरजूंना दान केले जाते, कुमारी का कन्यांचे पूजन  केले जाते  कुमारी का कन्यांना यथा शक्ती दान केले जाते,

 जोगवा मागितला जातो व जोगवा वाटला जातो, ग्रामीण भागातील लोकांचा असा समज आहे की जोगवा मागितल्याने व

जोगवात मिळालेले पदार्थ  सन्मानाने ग्रहण केल्याने देवी माता आपल्या सभोवतालच्या  दुरीताचा नाश करते,  व सुख समाधान लाभते

 निष्कर्ष

Navratri utsav  नवरात्री उत्सव साजरा करण्याच्या पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी भाविकांचे समर्पण सन्माननीय आहे.  देवी माता ही संपूर्ण जगताची माता आहे हे तत्व सर्व भाविकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेली माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल अशी आशा करतो

Disclaimer 

 या ब्लॉगमध्ये कोणत्याही रूढीचा वापरंपर्यंतचा उपयोग केला जावा अशी भावना नाही ही  पोस्ट फक्त माहिती स्वरूपात दिलेली आहे

Leave a comment