Navratri Colour 2023

Navratri Colour 2023

Navratri Colour नवरात्रीमध्ये  दुर्गा मातेच्या नऊ स्वरूपांचे पूजन केले जाते व त्या नऊ स्वरूपांच्या सन्मानाप्रीत्यर्थ नऊ

रंगांची वस्त्रे धारण करण्याची पद्धत आजकाल सर्वत्र प्रचलित झालेली दिसते

 नवरात्रीच्या  नऊ दिवसांमध्ये महिला ह्या नऊ रंगांचे कपडे धारण करतात तर बऱ्याच ठिकाणी अशा रंगांचे वस्त्रे दान

करण्याची ही पद्धत आहे

 तर मग नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपयोगात  आणल्या जाणारे रंग कोणते याची माहिती आपण या ब्लॉग पोस्टमध्ये घेणार आहोत

प्रत्येक दिवशी त्या दिवसानुसार चा रंग वापरणे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा विषय आहे याच रंगाचे कपडे घातले जावे असा

कोणताच नियम शास्त्रानुसार नाही.

 या रंगांना धारण करण्याचे काय महत्त्व आहे?  या नऊ रंगांचा नेमका काय अर्थ आहे हे आज आपण जाणून घेऊ

Navratri Colour

 नवरात्रीच्या पहिल्या दिवशी:-  नारंगी रंग

 म्हणजे या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले जातात किंवा दान केले जातात.नारंगी म्हणजे केशरी रंग हा सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो.

 म्हणजे जेव्हा आपण ही वस्त्रे परिधान करतो तेव्हा सकारात्मक ऊर्जेला आपण ग्रहण करतो असा त्याचा अर्थ मानला जातो

 नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी:-पांढरा रंग

 नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण केले जातात

पांढरा रंग हा शांतता आणि पावित्र्याचे प्रतीक असतो

 नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी:- लाल रंग

लाल रंग मांगल्याचे प्रतीक मानला जातो लाल रंगाची वस्त्रे परिधान केल्याने कार्य शुभ होतील अशी धारणा आहे

 नवरात्रीच्या चौथ्या दिवशी निळा रंग 

निळा रंग हा विशालता विश्वास आणि श्रद्धेचे प्रतीक मानला जातो या रंगाची वस्त्रे धारण केल्याने परमेश्वरा प्रति समर्पण आणि

श्रद्धा वाढते व चित्त स्थिर होते अशी धारणा आहे

 नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पिवळा रंग

पिवळा रंग हा तेजाचे चैतन्याचे स्वरूप मानला जातो  कोणत्याही कार्याला करायसाठी नवीन चेतना व उल्हासाची गरज असते

ही चेतना आणि उल्हास आपल्या आयुष्यात कायम राहो म्हणून देवीला प्रार्थना करण्यासाठी पिवळा रंगाचे वस्त्र धारण केले जातात

 नवरात्राच्या सहाव्या दिवशी हिरवा रंग

 हिरवा रंग हा संपन्नतेचे प्रतीक आहे  म्हणजे देवी मातेने आपल्याला धनसंपन्न बुद्धी संपन्न व्हायचे आशीर्वाद द्यावे अशी याचना

करत आजच्या दिवशी हिरवा रंग परिधान केला जातो

 नवरात्राच्या सातव्या दिवशी राखाडी रंग

 राखाडी रंग हा शिस्तीचे प्रतीक आहे प्रत्येक कार्य करताना ते शिस्तबद्ध पद्धतीने केल्या गेल्यास नक्कीच यश मिळते या

गोष्टीची जाणीव म्हणून आजच्या दिवशी राखाडी रंग परिधान केला जातो

 नवरात्राच्या आठव्या दिवशी जांभळा रंग

 जांभळा रंग हा महत्त्वकांक्षा आणि ध्येयसिद्धी या गुणांना दर्शविणारा रंग आहे.  म्हणजे व्यक्तीने प्रयत्नशील  असावे आणि

ध्येयसिद्धीसाठी प्रयत्न करावा

 नवरात्रीच्या नवव्या दिवशी मोरपंखी रंग

 मोरपंखी रंग हा सुपीकतेचे प्रतीक मानला जातो सुपीकता असल्यास आयुष्याची भरभराट होते असेच भरभराटीचे आशीर्वाद

देवी मातेने आपल्याला द्यावे म्हणून मोरपंखी रंग धारण केला जातो असा समज आहे

 निष्कर्ष

 नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या नऊ रंगांची वस्त्रे परिधान करण्याची पद्धत आताशा सुरू झाली आहे याची माहिती

आपण या पोस्टमध्ये घेतली

 या रंगांचा नेमका काय अर्थ आहे आणि कोणती इच्छा मनाशी बाळगून या रंगाची वस्त्रे परिधान केले जातात या प्रश्नांची

उत्तरेही  आपल्याला मिळाली असतील अशी आशा आहे

Disclaimer

नमूद केल्या गेलेली पोस्ट प्राप्त माहितीच्या आधारावर लिहिलेली आहे.  कोणत्याही प्रकारचे रूढी परंपरा प्रचलित करणे हा या

पोस्टचा उद्देश नाही हा लेख फक्त माहितीसाठी लिहिल्या गेलेला आहे

Leave a comment