नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये Nav-Durga puja केली जाते. आदिशक्ती मूळ माया माता दुर्गा हिने स्वतःची असंख्य रूपे दर्शविली आहेत ज्या रूपांचे आपण आदरपूर्वक पूजन करतो
पण नवरात्रीच्या या पुण्यकाळात मुख्य अशा नऊ स्वरूपांचे भजन पूजन केले जाते
Nav-Durga puja/ कोणत्या आहेत नवदुर्गा?
याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवस हा देवीच्या एका स्वरूपाला समर्पित आहे
त्या रूपा नुसारच या नवरात्राच्या काळात नऊ रंगांचे कपडे वापरण्याची पद्धत आताशा लोकप्रिय झालेली दिसून येते
नवरात्रीचे नऊ रंग
नवरात्रीच्या नऊ दिवशी पूजेला जाणाऱ्या नवदुर्गा
प्रथम शैलपुत्रिती द्वितीय ब्रम्हचारी ||
तृतीयम चंद्रघंटेती कुशमांडे ती चतुर्थकम्||
पंचम स्कंद पंचम स्कंदमातेति षष्टम् कात्यायनीती च ||
सप्तमं काल रात्रीच महागौरी ति चाष्टकम ||
नववं तू सिद्धी दात्रीच नवदुर्गाः प्रकीर्तिताः ||
देवीच्या या नऊ स्वरूपांचे महात्म्य गायिले व वाचले जाते
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी: माता शैलपुत्री चे पूजन
मातेच्या शैलपुत्र स्वरूपाचे पूजन केल्याने आयुष्यात स्थिरता शांतता व खंबीरता वाढते व्यक्तीची निर्णय क्षमता वाढवून
स्वतःवरील विश्वास खंबीर होत चालतो ज्या व्यक्तींचे मन अस्थिर आहे त्या व्यक्तींनी नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीची
उपासना करावी
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी: माता ब्रह्मचरणीचे पूजन
हे देवीचे निराकार असे तेजस्वी आणि तपचरणी स्वरूप आहे माता ब्रह्मचरणीच्या एका हातात जपमाळ तर दुसऱ्या हातात कमांडलो असल्याचे दिसून येते
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी: माता चंद्र घंटेचे पूजन
माता चंद्र घंटा हे देवीचे स्वरूप कल्याणकारी आणि शांतता प्रदान करणारे आहे देवी चंद्रघंटेची उपासना केल्याने व्यक्ती कष्टांमधून आणि संकटांमधून मुक्त होतो
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माता कुष्मांडे चे पूजन
देवी कुष्मांडे च्या पूजनाने व्यक्ती रोगमुक्त होतो व त्याचप्रमाणे निरोगी आयुष्य लाभते म्हणून अति काळापासून रोगाने
ग्रासलेल्या व्यक्तीने नवरात्रीच्या दिवसांमध्ये माता-कुष्मांडेचे आदरपूर्वक पूजन करावे
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी: माता स्कंद माते चे पूजन
महादेव पुत्र कुमार कार्तिकेय ला स्कंद असेही संबोधलेले आढळते स्कंदमाता अर्थात कुमार कार्तिकेची माता
देवीचे हे स्वरूप प्रेम वात्सल्य आणि ममतेचे प्रतीक
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी: माता कात्यायनी चे पूजन
महर्षी कात्यायन यांची कन्या असल्याकारणाने मातेच्या या स्वरूपाला का त्यांनी हे नाव प्राप्त झाले आहे देवी कात्यायनी ही
अमाप असे फळ देणारी आहे देवी का त्यांनी ची उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात
नवरात्रीच्या सातव्या दिवशी: माता काल रात्रीची पूजा
माता कालरात्रीही उग्र स्वरूपाची माता मानली जाते मातेचे हे स्वरूप दृष्टाचा व अशुभाचा नाश करणारे आहे
मातेच्या या स्वरूपाचे मनोभावे पूजन केल्याने शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात
नवरात्रीच्या आठव्या दिवशी: माता महागौरीची पूजा
नवरात्रीच्या आठव्या दिवशी माता महागौरीचे पूजन केले जाते पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान शिव शंकराला
पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली ज्यामुळे त्यांचा रंग काळवंटला प्रसन्न झाल्यानंतर भगवान शिव
शंकरांनी माता गौरीला गंगाजलाने स्नान करावे ज्याने त्यांचा रंग उजळला
म्हणूनच मातीला महागौरी असे नाव प्राप्त झाले
माता महागौरीच्या पूजनाने अक्षय पुण्याची प्राप्ती होते संकटाचा व पापाचा नाश होतो सुख समाधान आणि समृद्धीचे प्राप्ती होते
नवरात्रीच्या नवव्या दिवशी: माता सिद्धीदात्रीचे पूजन
माता सिद्धीदात्री ला माता सरस्वतीचे एक स्वरूप मानले जाते मातेच्या या स्वरूपाचे मनोभावे पूजन केल्याने सत सत विवेक बुद्धी व सिद्धी ची प्राप्ती होते
निष्कर्ष
Nav-Durga puja:- नवरात्रीच्या उत्सवात देवीच्या या नऊ रूपांचे मनोभावे पूजन केले जाते यांना नवदुर्गा असेही म्हटले जाते आपल्यालाही माहिती उपयुक्त ठरत असेल अशी मंगल कामना
Disclaimer
उपलब्ध असणारे पुस्तके या माहितीचा आधार असून ही पोस्ट फक्त माहिती देण्यासाठी बनवलेली आहे