Haritalika vrat kahani /हरितालिका व्रताची कहाणी

Haritalika vrat kahani: हरितालिका हे व्रत भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला केले जाते हे व्रत करताना पूजेनंतर व्रताची कहाणी वाचण्याची पद्धत असते

Haritalika vrat kahani

 पूजा विधी संपन्न झाल्याच्या नंतर वाचावयाची ही कहाणी अशाप्रकारे आहे

Haritalika vrat kahani

Haritalika vrat kahani

 कहानी अश्या प्रकार

 ऐका देवी हरतालिका ही तुमची कहाणी एके दिवशी शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं

“हे देवा  सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादा व्रत असेल तर ते मला सांगण्याची कृपा

करावी आणि कोणत्या पुण्याईने मी आपल्याला प्राप्त झाले याचीही माहिती मला सांगावी” त्यावर शंकराने सांगितलं “जसा

नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये  सूर्य श्रेष्ठ, चारही वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ देवतांमध्ये  भगवान विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ

त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ आहे याच व्रताच्या पुण्याईने तुम्हाला प्राप्त झाली आहेस हे वृत्त पूर्वजन्मी हिमालय

पर्वतावर केलं ते कसे व त्याचा विधी काय हे मी तुला आता सांगतो”

 हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी  तू केलस ते मी तुला सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं

म्हणून मोठे तप केले 64 वर्षे तर झाडाची पिकलेली पान खाऊन राहिली ऊन थंडी वारा हे तीनही दुःख सहन केलीस ते तुझा

श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास बरे द्यावी अशी त्याला चिंता पडली .  इतक्यात तिथे नारद

मुलींनी येणं केलं हिमालय महाराजांनी त्यांची  पूजा केली  सन्मान केला आणि त्यांच्या येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद मुनी

म्हणाले “ हे हिमालया तुझी कन्या आता उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला

तुझ्याकडे  मागणी करण्याकरिता पाठविले आहे  म्हणून मी इथं आलोय”  हे ऐकून हिमालयाला मोठा आनंद झाला त्यांनाही

गोष्ट कबूल केली. नंतर नारद मुनी तिथून निघून विष्णूकडे आले त्यांना ही सर्व हकीकत कळविली व आपण तिथून निघून

दुसऱ्या ठिकाणी चालला गेला. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस

असं पाहून तुझ्या सखी न तुला रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही; 

असं असून सुद्धा माझ्या बाप मला विष्णू स देण्याचे कबूल केले आहे याला बरे  काय उपाय करावा?  हे ऐकून  तुझ्या सखीने

तुला एका घोर अरण्यात नेलं  तिथे गेल्यावर तुम्हास एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा होती त्या गुहेत जाऊन तू

उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापन केलं त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण

केलं त्या पुण्याला माझं इथला  आसन हलले नंतर मी तुझ्या पूजेच्या ठिकाणी आलो तुला दर्शन दिलं आणि तुला वर मागण्यास

सांगितलं  तू म्हणालीस “ तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही”

मी तुझी ती, गोष्ट मान्य केली व तिथून गुप्त झालं

 पुढे दुसऱ्या दिवशी तू त्या व्रताचे विसर्जन केले मैत्रिणीसह त्याचे पाळणे केले इतक्या तुझा बाप तिथे आला तुला इकडे पळून

येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीकत सांगितली पुढे त्याने तुला मलाच अर्पण करण्याचे वचन दिले व तुला घेऊन घरी

गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुझ्या वडिलांनी तुला मला अर्पण केलं अशी या  व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली 

याला हरितालिका व्रत असे म्हणतात याचा विधी हा असा

ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरणा बांधावी केळीचे खांब बांधावे हे स्थळ सुशोभित करावे स्वच्छ करावे

तिथे रांगोळी घालावी पार्वतीसह महादेवाचे लिंग स्थापन करावे षडशोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही  हरितालिका व्रताची कहाणी करावी रात्री जागरण करावं

 या वताना प्राणी पापांपासून मुक्त होतो  साता जन्माचे पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचा सौभाग्य वाढतं या दिवशी

बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मबंद्या होतात दारिद्र्य येतं पुत्रशोख होतो कहाणी झाल्यावर यथाशक्ती सुवासिनींना वाण द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी व्रताची विसर्जन करावे

 ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळासाठी ब्राह्मणांचे द्वारे गाईचे गोठे पिंपळाच्या पारी सुफळासाठी संपूर्ण

  कहाणी नंतर आरती करावी व नैवेद्य दाखवावा

Also Read:- श्री गणपतीची कहाणी

हरितालिका व्रताची आरती

Faq of Haritalika vrat kahani

हरितालिका व्रताचा उपवास कधी सोडावा ?

 या व्रताचा उपवास निरंकार असतो म्हणजे व्रताची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी नैवेद्य दाखवावा व उपवास सोडावा

 हरितालिका व्रताच्या उपवासात काय खावे ?

 या व्रताच्या उपवासात फळ दूध दही हे पदार्थ खाऊ शकता बऱ्याच ठिकाणी साबुदाण्याची उसळ खारकेची खीर आणि उपासाला जमणाऱ्या सर्व गोष्टी (भगर वगळता)  खाण्याची पद्धत आहे

 हरितालिका व्रत न केल्यास काय होते ?

 पोथीत सांगितले आहे की हरितालिका व्रत न केल्यास दारिद्र्य येते  आणि अजून बरच काही  पण एक गोष्ट जी आपण लक्षात घेतली पाहिजे परमेश्वर कधीच कोणाचे वाईट करू शकत नाही
 म्हणजेच जर इच्छा असूनही काही कारणास्तव आपण व्रत करू शकत नाही तर मनोभावे प्रार्थना करून परमेश्वराची याचना करावी व  आपल्या सोबत भगवंत काही वाईट करेल हा विचार त्यागावा

हरितालिका व्रत कोणी करावे

 ज्या मुली लग्नाळू आहेत त्या मुली हे व्रत चांगला पती मिळावा म्हणून करतात तर सौभाग्यवती बायका आपले सहभागी टिकून राहावे म्हणून हरितालिकेचे व्रत करतात

 हरितालिका व्रत पूर्वीच्या काळात स्त्रिया अगदी पोथीत सांगितल्याप्रमाणे, कहानी असल्याप्रमाणे करायच्या  आता काळ बदलला वेळ बदलली स्त्रियांची स्थिती बदलली म्हणून या व्रतामध्येही स्त्रियांनी बरेच बदल केले आहेत

 स्वतः भगवंत सांगतात वेळेनुसार प्रत्येक गोष्ट बदलली गेली पाहिजे म्हणून कोणत्याही गोष्टीचा अट्टाहास न करता सहज आणि प्रेमाने जे साध्य होते ते करावे

निष्कर्ष

 भाद्रपद महिन्यातील महिलांचा जिवाभावाचा सण म्हणजे हरितालिका  म्हणून या पोस्टमध्ये आपण हरितालिका व्रताची कहाणी  स्पष्ट केली आहे  

Disclemar

ही पोस्ट फक्त व्रताची कहाणी सांगण्यासाठी लिहिली आहे

Leave a comment