Hartalika vrat arati /हरितालिका व्रताची आरती

 Hartalika vrat arati: हरितालिका व्रताची पूजा व कहानी संपन्न झाल्यानंतर हरितालिका व्रताची  आरती केली जाते  ती आरती अशा प्रकारे आहे 

पहिली आरती ही गणपतीची केली जाते नंतर हरितालिकेची

 Hartalika vrat arati /हरितालिका व्रताची आरती

जय देवी हरितालिके |  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळी के

 हर  अर्धांगी वससी|  जास्ती  यज्ञासी माहेरा |  तेथे अपमान पावसी  यज्ञकुंडी तू गुप्त होती 

जय देवी हरितालिके |  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळी के

रिघसी हिम्मद्रीच्या पोटी | कन्या होती तू गोमटी | उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी 

जय देवी हरितालिके |  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळी के

ताप पंचगणी साधने धूम्रपाने अधोवदने केली अति उपोषणे शंभुभ्रतारा कारणे

जय देवी हरितालिके |  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळी के

 लीला दाखविली  दृष्टी | व्रत हे केले लोकांसाठी | पुन्हा वरिसी तू दुर्जटी मज रक्षावे संकटी

जय देवी हरितालिके |  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळी के

 काय वरून अल्पमती नारायणा माता दाखवी  चरण आलो आहे मी शरण चुकवावे जन्म मरण

जय देवी हरितालिके |  सखी पार्वती अंबिके | आरती ओवाळीते ज्ञानदीप कळी के

हरितालिकेची आरती झाल्यानंतर कापूर धूप दाखवून नैवेद्य दाखवावा मनोभावे नमस्कार करून सुहासिनींना यथाशक्ती ओटी भरावी

हरितालिका व्रत कथा

 निष्कर्ष

 प्रत्येक व्रताच्या पूजेनंतर आरती करण्याची परंपरा आहे म्हणून हरितालिका व्रताची पूजा व कहाणी झाल्यानंतर हरितालिका व्रताची आरती करावी

Disclemar

 भारतामध्ये मुख्यतः महाराष्ट्रामध्ये पारंपारिक पद्धतीने आरत्या गायल्या जातात म्हणून या कहाणी आणि आरती मध्ये साम्य असणे स्वाभाविक आहे. ही आरती पूजाविधी संपन्न करण्यासाठी दिलेली आहे 

Leave a comment