Part Time Business Ideas: इंटरनेट शिवाय करू शकता पार्ट-टाइम व्यवसाय 2023

आजच्या काळाची आणि प्रत्येक सामान्य मनाची इच्छा Part Time Business Ideas

आजच्या वेगवान आणि महागाई च्या जगात प्रत्येकाला स्वतःचे छंद, आवडी, आणि life-Style जपायला किंवा मेंटेन करायला आवडत  पण वाढत्या महागाईने आणि कॉम्पिटिशन ने हैराण करून सोडलं .

अशा वेळी आपल्याला एखाद्या छोट्या मोठ्या income Source ची गरज भासते.

online business ideas

आपण आपल्या बळाने काही कमवाव तर प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, तर मग आज आपण अशा काही  पार्ट-टाइम व्यवसाय करण्याच्य कल्पना पाहुयात ज्या माध्यम वर्गीय व्यक्तीला करायला आवडतील व परवडतील.

Part-Time Business Ideas

Part Time Business Ideas

१) ट्युशन टीचर :-

आज कालच्या जगात अगदी छोट्या मुलांनाही पालक ट्युशन लावतात, कारण आहे वेळेची कमतरता, आई-वडील दोघेही जॉब ला असतील तेव्हा ते मुलाचा अभ्यास घेऊन त्याच्याकडे हवं तेवढं लक्ष देऊ शकत नाहीत.

अशा वेळी आपलं मुलं स्पर्धेत मागे पडायला नको म्हणून त्याला ट्युशन लावली जाते

त्यात त्याचा शाळेचा अभ्यास घेतला जातो व अभ्यास क्रम शिकवलं जातो.

अर्थातच जर तुम्हला आभासाची, शिकवण्याची आवड असेल तर ते पहिली दुसरीचे ट्युशन घेणे अवघड नाही ..

२) जिम ट्रेनर :-

जिम मध्ये व्यायाम करायला जाणे , फिट राहणे,याची आवड असेल आणि फिटनेस साठी काय रुटीन महत्वाचं असत याची माहिती असेल ते तुम्ही नक्कीच चांगले जिम ट्रेनर होऊ शकता .

त्यासाठी तुम्हाला स्वतःचा जिम उभा करायची गरज नाही , जवळ पास च्या जिम मध्ये आपापली करू शकता.

३) योग ट्रेनर :-

जेव्हा पासून भारताने योग डे साजरा करायला सुरवात केली तेव्हा पासून लोकांना योग चे फायदे कळायला लागले आणि प्रत्येकजण स्वतःच्या स्वास्थ्य साठी १०-१५ मिनिट तरी योग करायचा विचार करत .

अशा वेळी किफायती रेट मध्ये जर तुम्ही योग शिकवत असाल तर नक्कीच व्यवसाय चांगला चालेल

४) इव्हेंट मॅनेजमेंट

महाराष्ट्र हा विविधतेने सजलेला आहे इथे असंख्य पारंपरिक सण, मुंजे, डोहाळजेवण, वाढदिवस, मंगळागौर सारख्या गोष्टी सेलिब्रेट केल्या जातात.

त्यासाठी प्रत्येकजण महागडा इव्हेंट मॅनेजर बोलवत नाही अशा वेळी खूप प्रोफेशनल नसणाऱ्या व्यक्तीलाही इव्हेंट मॅनेज करता येऊ शकतो

५) छंद जोपासून व्यवसाय करणे

बऱ्याच जणांना स्वतःचे काही छंद  असतात त्यानुसार पण आपण काम करू शकतो,जस

मातीच्या कलाकृती येत असल्यास क्ले आर्ट शिकवू शकता.

पुस्तके किंवा मासिके गोळा करायचं छंद  असेल तर छोटी लायब्ररी करू शकता .

गाणे शिकवू शकता , पाळणाघर चालवू शकता ,पेन्टिंग ,रांगोळी काढणे. या गोष्टी देखील व्यवसाय सुरु करायला मदत करू शकतात .

भांडवल असेल तर एखादे दुकान किंवा वर्क शॉप देखील उघडू शकता . Part-Time व्यवसाय च्या या सिरीज मध्ये आपण व्यवसायाची थोडक्यात माहिती घेणार आहोत.

येणाऱ्या पार्टस मध्ये  महिलांसाठी Part Time Business Ideas, सारख्या कल्पनांचा आढावा घेऊया

निष्कर्ष

Part Time Business Ideas च्या या पार्ट १ मध्ये तुमची उद्योजकता शोधण्याचा, अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचा आणि मौल्यवान अनुभव मिळविण्याचा एक उत्कृष्ट मार्ग असू शकतो.

आपण आपल्या आवडी, कौशल्ये आणि उपलब्ध वेळेशी जुळता व्यवसाय निवडला तर ते काम करायचा कंटाळा हि वाटणार नाही आणि मिळकत होईल ते उत्तमच.

हि पोस्ट आवडली असल्यास नक्की शेअर करा .    

Leave a comment