महाराष्ट्राचा विविध सांस्कृति मध्ये भक्कम पाया आहे. त्यात गणेश चतुर्थी दिवाळी होळी हे रंगीबेरंगी सण आहेत; शास्त्रीय
संगीत आणि नृत्य प्रकार; वडा पाव आणि पुरण पोळी, जे स्वादिष्ट जेवण आहेत; आणि समृद्ध मराठी साहित्यिक वारसा.
महाराष्ट्राच्या संस्कृतीतही आदरातिथ्य, ज्येष्ठांचा आदर आणि नऊ गजांच्या साडीसारखा पारंपरिक पेहराव आहे. एक
चैतन्यशील आणि विशिष्ट सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातील ऐतिहासिक प्रथा आजच्या प्रभावांमध्ये मिसळल्या आहेत.
भारत हा विविधतेचा आणि पुण्यवंतांचा देश मानला जातो त्यातलं आपलं राज्य महाराष्ट्र या राज्याला संतांनी साहित्यांचा वसा लाभलेला आहे.
साहित्य संस्कृती परंपरा गुढी-पाडी ह्या जातीनुरूप माणसानुरूप बदलत जातात वेळ बदलली मानव हा अत्याधुनिक झाला आहे तरीही भारत आणि भारतातले लोक आपल्या संस्कृतीचा वारसा जपून आहेत
हाच वारसा जपण्याची ओढ मलाही आहे. माझ्या बालपणी होणाऱ्या सगळ्या सणांना आणि परंपरांना मला माझ्या नंतरच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे खरं पाहता ही प्रत्येक पालकाची जबाबदारी
जर आपण आपल्या लहानग्यांपर्यंत या रुढी परंपरा आणि त्यांचा महत्त्व नाही पोहोचवलं तर आज ज्या गोष्टींचा आपल्याला
अभिमान आहे त्या गोष्टी कालबाह्य होत जातील म्हणूनच हा ठेवा असाच अनंत काळापर्यंत टिकवून ठेवण्याचे अमृत व्रत हे प्रत्येकाने घ्यायला हवे
याची सुरुवात मी स्वतः पासून करण्याचे ठरवले,
महाराष्ट्रही संतांची भूमी आहे हे या भूमीला अथांग असे साहित्यकार आणि साहित्य लाभले आहे त्यातील काही कथा कहाण्या
गाणी भारुड स्तोत्र अभंग आरत्या पोवाडे ह्या तर शिवाजी महाराजांच्या काळात आधीपासून चालत आलेल्या आहेत .
मी माझ्या या वेबसाईटवर सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे या प्रयत्नात मला या महाराष्ट्रातील माझ्या लोकांचे समर्थन लाभेल अशी सदिच्छा
साहित्य संस्कृती.