श्री गणपतीची कहाणी
आपल्या संस्कृती मध्ये जेव्हा हि कोणते पूजा असते किंवा शुभ कार्य असत तेव्हा आपण आद्य पूजनीय देवतेचे म्हणजे
श्री गणपती देवतेचे पूजन करतो त्याच प्रमाणे जेव्हा आपण एखाद्या व्रताची पूजा करतो आणि त्याची कहाणी वाचतो तेव्हा पहिले गणपतीची कहाणी वाचली जाते आणि आरती करताना गणपतीचीच आरती पहिली आरती केली जाते
तर मग आज आपण गणपतीची कहाणी काय हे पाहू हीच कहाणी संकष्टी चतुर्थी ला देखील वाचली जाते . मला आठवत कि माझी आजी हि कहाणी रोज म्हणायची, आणि सांगायची कि पाहणी तिच्या लहानपणी सगळे भावंडं मिळून म्हणायचे .
श्री गणेशाय नमः
एक देवा गणेशा ही तुमची कहाणी, स्थान हे देखणे बाळे
निर्मळ मळे, नीराचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे.
मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा ? श्रावण्या
चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं
पशापायलीचं पीठ कांडावं. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे.
६ ब्राह्मणाला द्यावे,६ सह कुटुंबी भोजन करावं यथा शक्ती दान,
महा पुण्य. असा गणराज मनीं-ध्याइजे, मनीं-पाविजे; चिंतिले लाभिजे;
मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धि करिजे.
ही साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सु-फळ संपूर्ण
श्री गणेशाला अर्पण
महाराष्ट्राची संस्कृती आणि सन्माननीय साहित्य आणि परंपरेचा ठेवा
कहाणी नंतर गणपती बाप्पाला मोदक किंवा गूळ नैवेद्या ला दाखवावे आरती करून पूजेची सांगता करावी
हि पोस्ट आवडली असता कमेंट आणि शेअर नक्की करा.
Disclaimer हे साहित्य भारतीय असून ते आता प्रताधिकार मुक्त झालेले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार कोणत्याही भारतीय साहित्यिकाच्या मृत्युपश्चात ६० वर्षांनी त्याचे साहित्य हे प्रताधिकारमुक्त(Copywrite Free) होते.